बसव जयंती अर्थपूर्ण रीतीने साजरा करूयात : शिवानंद भरले
जागतिक लिंगायत महासभेची महत्त्वाची बैठक संपन्न

सोलापूर : प्रतिनिधी
विजापूर रोड येथील अत्तार नगर शिक्षक सोसायटीच्या सभागृहात झालेल्या जागतिक लिंगायत महासभेच्या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी तथा कलबुर्गी जिल्हा अध्यक्ष प्रभुलिंग महागावकर, प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे ,राज्य शिक्षक नेता शिवानंद भरले, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष वीरभद्र यादवाड, जागतिक लिंगायत महासभा सोलापूर जिल्हा अध्यक्ष शिवानंद गोगाव, लिंगायत सेवा संघाचे अध्यक्ष विजयकुमार शेटे, मुख्याध्यापक महादेव बडा उपस्थित होते.
सोलापुरात लिंगायतांची संख्या मोठी असून शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांची संख्याही मोठी आहे. सर्वांनी एकत्र येऊन यंदाची बसव जयंती अर्थपूर्ण पद्धतीने साजरी करूया, असे मत शिक्षक संघाचे नेते शिवानंद भरले यांनी व्यक्त केले.ते रविवारी विजापूर रोडवरील अत्तार नगर शिक्षक सोसायटीत शिक्षकांसाठी आयोजित जागतिक लिंगायत महासभेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत बोलत होते. या बसव जयंतीनिमित्त समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मान देऊन मुलांमध्ये बसवादि शरण यांचे वाचन स्पर्धा आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे जागतिक लिंगायत महासभेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे म्हणाले की महाराष्ट्रात महासभा कशी कार्यरत आहे, जागतिक लिंगायत महासभा शिक्षक संघटन करून , शिक्षक व विद्ध्यार्थ्या मध्ये बसव तत्व- सिद्धांत जागृत करावे. भविष्यातील कामाचा आराखडा त्यांनी महासभेला सांगितला.
कलबुर्गी जिल्हाध्यक्ष प्रभूलिंग महागावकर म्हणाले की, महासभा गेल्या काही वर्षांपासून कर्नाटकात चांगले काम करत असून, महासभेचे कार्य सोलापूरसह राज्याच्या सर्व भागात पोहोचविण्याचे काम सोलापूरच्या शिक्षक नेता शिवानंद भरले व शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वीरभद्र यादवाड यांनी पुढाकार घ्यावे असे आवाहन केले.
यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वीरभद्र यादवाड, लातूरचे विजयकुमार शेटे, उदय चौंडे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव, उपाध्यक्ष राजेंद्र खसगी, कोषाध्यक्ष नागेंद्र कोगनुरे, युवाध्यक्ष शिवराज कोटगी, अक्कलकोट अध्यक्ष सचिन कालिबत्ते, कलबुर्गी मुख्याध्यापक महादेव बाडा आदी उपस्थित होते.