सोलापूर : प्रतिनिधी
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त अक्कलकोट तालुक्यातील जेऊरवाडी चे सुपुत्र बाबु तिपण्णा राठोड पोलीस उपनिरीक्षक जिल्हा वाहतुक शाखा सोलापूर व त्यांचे सहकारी रोहित थोरात व स्वप्नीलकुमार कोळी यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन करण्यात आले व डॉ. हेडगेवार रक्तपेढी सोलापूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी बाबु राठोड व सहकाऱ्यांनी रक्तदान करून रक्तदान हेच सर्वश्रेष्ठदान सर्व युवकांना रक्तदानाचे महत्त्व समजून सांगितले व रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
या वेळी जाफर मुल्ला, श्रीकांत राठोड, कृष्णा भुताळे, वृषाली भालेराव, आम्रपाली भालेराव, तृप्ती भालेराव, चैताली भालेराव, विश्वजीत भालेराव, आतिश भालेराव, विजय भालेराव, विजय राठोड, अतुल भालेराव, लक्ष्मण राठोड, रोहित भालेराव, विजय गायकवाड, लक्ष्मण वाघमारे, अंबादास राठोड, नामदेव राठोड,
राजू राठोड, अजयसिंह राठोड, संतोष जाधव, दत्तू भालेराव, विष्णू भालेराव, शिवाजी भालेराव, काशिनाथ जाधव, विलास भालेराव, खाजाप्पा भालेराव, गणपती खरटमल, गुलाब जमादार आदी जेऊरवाडी, कडंबगाव, अक्कलकोट स्टेशन, जेऊर येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.