सोलापूर : प्रतिनिधी
राणी लक्ष्मीबाई बहुउद्देशीय संस्था व शिवसेना शहर उपप्रमुख अनिता गवळी यांच्या वतीने शिवशंकर थोबडे प्रशालेत बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सामुदायिक वाचन व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी शिवसेना शहर प्रमुख मनोज शेजवाल, शाहीर रमेश खाडे, पिरटाकळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर लांबतुरे, रसायनशास्त्र प्रमुख अंजली लावंड, शिवशंकर थोबडे प्रशालेचे मुख्याध्यापक युवराज चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भाषणे व संविधान गीत सादर केले.
शाहीर खाडे यांनी आंबेडकर चरित्रावर पोवाडा सादर केला. सामुदायिक वाचन उपक्रमास शिवसेना संपर्क प्रमुख महेश साठे यांनी भेट दिली व उपक्रमांचे कौतुक केले. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
माता तरुण मंडळ व राणी लक्ष्मीबाई बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने थोबडे वस्ती येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त महिलांसाठी संगीत खुर्ची, मनोरंजनात्मक खेळ, विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ एन. के क्षीरसागर व उद्योजक नागेश गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संयोजिका अनिता गवळी, विशाल शिंदे, मिलिंद खरात, राम शिंदे, अनिल गाडे, दिलीप वाघमारे, पंकज लांबतुरे, सीताराम होनकळस, सीताराम शिंदे व ज्ञानेश्वर लांबतुरे उपस्थित होते शेवटी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.