सोलापूर : प्रतिनिधी
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करून 27 हिंदूंना ठार मारले याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोलापूर सकल हिंदू समाजाच्या वतीने चार हुतात्मा चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवून त्याला जाळण्यात आले. ‘एक है तो सेफ है’, ‘ते धर्म विचारून मारतात तर तुम्ही धर्म विचारून वस्तू खरेदी करा’ यासह विविध विषयांचे बॅनर युवकांच्या हातात झळकले. अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत पावलेल्या 27 हिंदूंना मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, यासह विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
आंदोलनावेळी बोलताना सकल हिंदू समाजाचे समन्वयक सुधाकर बहिरवाडे म्हणाले, भारत सरकारने अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याला जशास तसे उत्तर द्यावे. त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल मध्ये हजारो हिंदूंची हत्या होत आहे तेथे कडक शासन करावे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तान विषयी लिहिलेले पुस्तक सर्वांनी वाचावे. जिहादी वृत्तीचे मुस्लिम आपले कधीच नव्हते, नाहीत आणि भविष्यात नसणार आहेत. त्यामुळे योग्य ती कारवाई व्हावी अन्यथा सकल हिंदू समाज गप्प बसणार नाही असे म्हणत सरकारला इशारा दिला.
यावेळी सोलापूर सकल हिंदू समाजाचे सुधाकर बहिरवाडे, शिवराज गायकवाड, सतीश आनंदकर, प्रविण सरवदे, विशाल पवार, ओंकार चव्हाण, शेखर फंड, सिद्धार्थ पाटील, महेश जेऊरे, प्रसाद झेंडगे, सुरज भोसले, प्रभू लिंग पुजारी, लतेश हिरवे, शुभम कराळे, पैलवान रोहित यादव, केशव म्हैत्रे, प्रशांत गुत्तीकोंडा, विनायक कोरे, विनायक पाटील, अविनाश हजारे, सुनील विटकर असे अनेक युवा कार्यकर्ते व महिला शितीजा क्षीरसागर असे अनेक महिला उपस्थितीत होत्या.