सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर मधील नामांकित श्री. निलकंठेश्वर शिक्षण संस्था सोलापूर या न्यासातील निवडणूकीत बहुमताने निवडून आलेल्या संचालक श्री. श्रीनिवास शंकर बंदगी यांच्या संचालक पद रद्दचा बदल अहवाल मे. धर्मादाय उपायुक्त श्री. कुंभोजकर साहेबांनी फेटाळला.
श्री. निलकंठेश्वर शिक्षण संस्था सोलापूर मधील चुकीच्या निर्णयाविरुध्द संचालक म्हणून श्री. श्रीनिवास शंकर बंदगी यांनी वेळोवेळी आवाज उटविला. याचाच राग मनातठेवून सत्ताधारांनी त्यांचे संचालक मंडळ व्यवस्थापन सभेत श्री. श्रीनिवास शंकर बंदगी यांचे संचालक पद चुकीच्या पदत्तीने रद्द करण्याचा ठराव केला व तसा बदल अहवाल मे. धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे दाखल केला. सदर बदल अहवालाचा प्रकरणात श्री. श्रीनिवास शंकर बंदगी यांनी त्यांचे वकिल श्री. मनोज नागेश पामूल यांच्यामार्फत रितसर हरकत घेतला व मे. धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे निदर्शणास आणून दिले की, संचालक पद रद्द करण्याचा अधिकार व्यवस्थापन मंडळाला नाही व ते केवळ मे. धर्मादाय उपायुक्तांनाच असल्याने सदर बदल अहवाल रद्द होण्यास पात्र असल्याचे युक्तिवाद अॅड. मनोज नागेश पामूल यांनी मांडले. सदर युक्तिवाद ग्राह्य धरून मे. धर्मादाय उपायुक्त श्री. कुंभोजकर साहेब यांनी प्राथमिक मुद्दा काडून संचालक रद्दचा बदल अहवाल फेटाळण्यात आला. सदरचा निर्णय अत्यंत जलद गतीने मिळाल्याने संपूर्ण समाज आनंदी आहे.
मे. धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे दाखल केलेला संचालक रद्दचा बदल अहवाल आजरोजी फेटाळल्याने श्री. श्रीनिवास शंकर बंदगी यांना उद्या दि. ३०/०४/२०२५ रोजी होणाऱ्या श्री. निलकंठेश्वर शिक्षण संस्था, सोलापूरच्या अंतर्गत श्री. निलकंठेश्वर शिक्षण संकुल या संस्थेचे नामकरण व उद्घाटन सोहळा असल्याने संचालक म्हणून श्री. श्रीनिवास शंकर बंदगी यांचा सदर कार्यक्रमात सन्मानाने सहभाग होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने समाजात अत्यंत आनंददायी व उत्साहाचा वातावरण निर्माण झालेला आहे आणि संपूर्ण समजाच्या वतीने श्री. श्रीनिवास शंकर बंदगी यांना शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
या प्रकरणात हरकतदार यांच्याकडून विधिज्ञ ॲड. मनोज पामुल, ॲड. श्रीनिवास बंडी, ॲड. ज्योती अल्ली, ॲड. राकेश कोपेंल्ली, ॲड. बालराज कैरमकोंडा, ॲड. तुषार पामुल व ॲड. स्वप्नील पुंजाल यांनी काम पाहिले व संस्थेतर्फे ॲड. अंबादास रायनी यांनी काम पाहिले.