सोलापूर : प्रतिनिधी
तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या प्रयत्नातून निराळे वस्ती येथे उपजिल्हा प्रमुख तुकाराम मस्के यांच्या मागणीनुसार भव्य आणि देखणे शिवमंदिर बांधण्यात आले या शिवमंदिराचे लोकार्पण कार्यक्रम मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला.
यावेळी परिवार मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत निराळे वस्ती येथील शिव मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शिव मंदिराचे प्रमुख तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तुकाराम मस्के उपस्थित होते. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
शिव मंदिराच्या लोकार्पणाप्रसंगी बोलताना तुकाराम मस्के म्हणाले, मागील 25 वर्षापासून निराळे वस्तीतील नागरिक शिव मंदिराची मागणी करत होते परंतु ती पूर्ण होत नव्हती अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात निधी मंजूर झाला जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी कामास सुरुवात केली. आमचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
लोकार्पणानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्व मंत्री शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, कोणतीही अडचण आल्यास तात्काळ संपर्क साधावा. जुने ज्येष्ठ शिवसैनिक नाना मस्के यांचे स्वप्न पूर्ण झाले यात आनंद आहे.
यावेळी निराळे वस्तीतील जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे ज्ञानेश्वर शिंदे, अजय माने, अजय मस्के, नागा मंडलिक, लखन पवार, मनोज भांगे, गणेश कोरे, अविनाश हात्तरगी, सिद्धू कोरे, सिदराम ढोबळे, जय मस्के, सचिन सुरवसे आदिसह कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.