सोलापूर : प्रतिनिधी
सध्या सोलापूर शहरामध्ये तीव्र प्रमाणात पाणी टंचाई असून पाणी पुरवठा पाच दिवसाआड व कमी दाबाने होत आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील हातपंप व इलेक्ट्रिक पपं हे मोठ्या प्रमाणात नादुरुस्त असून ते बंद अवस्थेत आहेत. संबंधित अधिकाऱयांना आपण संपर्क केला असता ते दुरुस्त करण्यासाठी अनास्था दिसून येत आहे. या संदर्भात पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांना व्यक्तिगत भेटून सोलापूर महानगरपालिका माजी नगरसेवक विनोद धर्मा भोसले यांनी निवेदन दिले आहे.
यामध्ये पालिका डॉ सचिन ओंबासे यांनी यामध्ये तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा आंदोलनाचा इशारा नगरसेवक विनोद भोसले यांनी दिला आहे. यावेळी राज सलगर, सागर उबाळे, सुभाष वाघमारे, श्रीकांत गायकवाड, नितीन जमदाडे आदी उपस्थित होते.