सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर चेस अकॅडेमीच्या वतीने सोलापुरात सोमवार ५ ते १० मे दरम्यान सकाळी ९ ते ११ व सायं. ५ ते ७ या वेळेत जुळे सोलापुर, एम्प्लोयमेंट चौक, अशोक चौक, बाळी वेस अशा शहरातील विविध ठिकाणी बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात बुद्धिबळातील विविध कौशल्ये, मध्य व अंतिम पर्वातील डावपेच, आक्रमण व बचावाची तंत्रे, डावाच्या सुरुवातीच्या चालींचे महत्व, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या डावातील विश्लेषण तसेच हत्ती व प्याद्याच्या अंतिम पर्वातील बारकाव्याबाबतचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्य व राष्ट्रीय खेळाडूंसाठी तसेच चार वर्षापासून पंधरा वर्षापर्यंतचे नवोदित व उदयोन्मुख खेळाडूंकरिता शिबीर संपन्न होणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी स्पर्धा देखील होणार असून स्पर्धेत प्रथम येणाऱ्या तीन खेळाडूंना आकर्षक मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी खेळाडूंनी अकॅडेमीचे मुख्य व राष्ट्रीय प्रशिक्षक सुमुख गायकवाड (मो. क्र. ८८३०४३२१८४) व उदय वगरे (मो. क्र. ८८८८०४५३४४) यांच्याकडे संपर्क साधावा असे अकॅडेमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर यांनी सांगितले आहे.
शिबिरात सहभागी खेळाडूंना जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना निश्चितच फायदा होणार असल्याने या शिबिरात जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, अतुल कुलकर्णी, उद्योजक रविंद्र जयवंत, नितीन काटकर, प्रशांत गांगजी, संतोष पाटील, गोपाळ राठोड, भरत वडीशेरला आदींनी केले आहे.