सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रात बीफ बंदी आहे त्या अनुषंगाने बिफ विक्री आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येते. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने बिफ मार्केट संदर्भात स्थानिक दैनिकात जाहीर प्रसिद्धीकरण देण्यात आले होते. ही माहिती सोलापुरातील स्थानिक हिंदुत्वादी संघटनांना मिळतात त्यांनी यावर आक्षेप नोंदवला. याची माहिती शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांना देण्यात आली, त्यांनी लागलीच महापालिका आयुक्त डॉ सचिन ओबासे यांना फोन करून याविषयी माहिती दिली. पहा काय म्हणाले आमदार देवेंद्र कोठे…
आमदार देवेंद्र कोठे यांच्या फोन नंतर सोलापूर महानगरपालिका, सोलापूर नगर अभियंता कार्यालय यांच्यावतीने शुद्धीपत्रक काढले. त्यातील मजकूर खालील प्रमाणे..
सोलापूर शहरात विविध ठिकाणी BOT प्रणालीअंतर्गत व्यापारी संकुल (Commercial Complex) व परवडणारी घरे (Affordable Housing) उभारणेकामी व्यावसायिक विकासक तसेच नागरिकांचे मत (Opinion) जाणून घेणेबाबत दि. ०३/०५/२०२५ रोजी जाहीरप्रसिद्धीकरण करणेत आलेले होते.
सदर जाहीरप्रसिद्धीकरणा मधील व्यापारी संकुल (Commercial Complex) अनू.क्र. २ मध्ये नमूद पाच्छा पेठ, येथील शासन मंजूर नगर रचना योजना क्र. १, अंतिम भूखंड क्र. ४४ येथे बीफ मार्केट व व्यापारी संकुल बांधणे. त्या ऐवजी अनू.क्र. २ पाच्छा पेठ, येथील शासन मंजूर नगर रचना योजना क्र. १, अंतिम भूखंड क्र. ४४ येथे मटण मार्केट व व्यापारी संकुल असे वाचावे.