सोलापूर : प्रतिनिधी
सन 2024 मध्ये राज्यात नवनियुक्त सरकार स्थापित झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात सुधारणा व कार्यशिलता वाढविण्यासाठी 100 दिवसाचा उपक्रम जाहीर केला होता. त्यामध्ये कार्यालयीन सुधारणा यामध्ये प्रलंबित प्रकरणांची निर्गती, स्वच्छता, अभ्यागताना सुविधा वैगेरे 07 मुद्द्यावर सुधारणा करण्यासाठी सूचित केले होते. सोबतच सूचीबद्ध उपक्रम दिला होता.
या उपक्रमामध्ये अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तसेच प्रितम यावलकर अपर पोलीस अधीक्षक यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला होता. पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेस भेटी देऊन या उपक्रमात चांगल्या प्रकारे सहभाग घेऊन कार्यालयीन सुधारण्यासाठी मार्गदर्शन केले होते. तसेच आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार व पाठपुरावा केला होता. त्यामधून जिल्ह्यातील पोलीस ठाणेस फर्निचर उपलब्ध करून दिले, तसेच इमारतींना रंगरंगोटी केली. तक्रारदारांसाठी कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक, प्रलंबित गुन्हे/ अर्ज /मुद्देमाल, आरोपी दत्तक योजना तसेच स्मार्ट पोलीस, इत्यादी महत्वाचे विषय हाती घेऊन नियोजित कार्यक्रम आखून दिला. त्यावर देखरेख करून निर्गती करून घेतली आहे. जिल्ह्य़ातील उद्योजक यांचेशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सुधारणा करून कार्यालयाचा कायापालट केला होता.
महाराष्ट्र शासनाचे या 100 दिवसाचे केलेल्या कामाचा अहवाल शासनास सादर केला होता. त्याचे मूल्यमापन शासनाचे विशेष समितीने करून त्याचा निकाल जाहीर केला असून त्यामध्ये पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांस क्रमांक मिळला आहे. या विशेष कामाबद्दल अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.