सोलापूर : प्रतिनिधी (बार्शी)
शेतकरी संघटनेचे नेते बार्शी तालुका अध्यक्ष शरद भालेकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पाथरी प्रकल्पातील कॅनॉल ची दुरुस्ती करून तत्काळ शेतकऱ्यांना पाणी मिळावे या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील. पाथरी प्रकल्पातून आदी पिंपळगाव (दे) जानपुर, ममदापूर, खामगाव, परिसरात गेली 15 वर्षापासून कॅनॉल ना दुरुस्त असून तो तत्काळ कॅनॉल दुरुस्त करून शेती पिकांना पाणी मिळावे या मागणी साठी आंदोलकांची मागणी वरिष्ठ कार्यकारी संचालक महाराष्ट्र पाटबंधारे विभाग कार्यालयाकडे प्रस्तावित करून आमदार दिलीप सोपल यांनी कॅनॉल दुरुस्तीला तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी केली.
शेतकऱ्याला हक्काचे पाणी पूर्वीप्रमाणे कॅनॉलला सोडण्यात यावे. सदर कॅनॉल अनेक दिवसापासून नादुरुस्त आहे संबंधित शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी प्रकल्पामधील पाणी प्रवाहाच्या वहिवाटीची मोडतोड करून, कायद्याची पायमल्ली केली. कॅनॉल नांगरत करून बुजवला गेला आहे. त्याचे अस्तरीकरण करून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने सदर कॅनॉलचा सर्वे, मोजमाप करून अतिक्रमण हटवण्याची मोहीम अधिकाऱ्यांकडून राबविण्यात यावी. तसेच शेती पिके करपून जात आहे. शेतकऱ्यांना हक्काचे पूर्वीप्रमाणे कॅनॉल द्वारे पाट पाणी मिळावे सदर नादुरुस्त कॅनॉल दुरुस्ती साठी संबंधित विभागाकडून आमदार दिलीप सोपल यांचेकडून तात्काळ निधी उपलब्ध करावा. अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते बार्शी तालुका अध्यक्ष शरद भालेकर यांनी केली.
मागणीसाठी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यावेळी पाटबंधारे विभागाचे पटेल यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले यावेळी पांगरी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत काटकर यांच्या सहकाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
यापुढे शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावर मुंबई मंत्रालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटने कडून देण्यात आला.
यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे प्रवक्ते/ मार्गदर्शक रामराव अप्पाराव काटे पाटील, आंदोलक समाधान भालेकर (खामगाव), महेश गलांडे, पोपटराव गलांडे, येळंब, दादा कुरळे, सचिन आगलावे आधी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.