सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ शिरिष वळसंगकर यांनी गोळी झाडून राहत्या घरामध्ये आत्महत्या केली आहे आत्महत्या होऊन जवळपास वीस दिवसांचा कालावधी लोटला आहे अद्याप पर्यंत या प्रकरणात पोलीस कोणत्याच ठोस भूमिकेपर्यंत पोचू शकलेले नाहीत.
त्यामुळे मीडिया मधून उलट सुलट बातम्या येत आहेत मुळात आत्महत्या झाल्या नंतर ज्या अधिकाऱ्यांकडे तपास देण्यात आला होता तो अधिकारीही बदलण्यात आला नवीन अधिकारी तपास व्यवस्थित करत नाहीत. मीडियासमोर जाऊन कोणतीही माहिती देत नाहीत त्यामुळे दररोज वर्तमानपत्रातून व इलेक्ट्रॉनिक मीडिया मधून उलटसुलट बातम्या येत आहेत.
यामुळे जनमानसात गृह खात्याची प्रतिमा मलिन होत आहे त्यामुळे या आत्महत्या प्रकरणाचा तपास SIT किंवा CID कडे देण्यात यावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे केली आहे.