सोलापूर : प्रतिनिधी
इसम नामे, सैफ इरफान यादगिरी, वय-२५ वर्षे, रा. १३३/३, क विडी घरकुल, कुंभारी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर याचे विरुध्द सन २०२४ या कालावधी मध्ये मोटार सायकली बनावट चावीने उघडून तसेच हॅन्डल लॉक तोडून चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचे विरुध्द जेलरोड पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन त्यांचे कडील तडीपार आदेश क्र.१०३३/२०२५ दि.२२/०४/२०२५ अन्वये, इसम नामे, सैफ इरफान यादगिरी, वय-२५ वर्षे, रा. १३३/३, क विडी घरकुल, कुंभारी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर यास सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आले आहे.