सोलापूर : प्रतिनिधी (पंढरपूर)
छावा क्रांतिवीर सेनेचे ११ वे महाधिवेशन महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, युवक आणि मराठा समाजाच्या न्यायासाठी ठरलेला एक निर्णायक टप्पा ठरला. या अधिवेशनासाठी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कामगार नेते अभिजीत राणे तर कार्यक्रमाचे उद्घाटक माजी राज्यमंत्री दर्जा रविकांत तुपकर यांच्या शुभहस्ते झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून छावा क्रांतिवीर सेनेच्या ११ व्या राज्यस्तरीय अधिवेशनास उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
महामंडलेश्वर स्वामी, शनिभक्त संत सुखदेव महाराज, भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण, आमदार समाधान अवताडे, आमदार अभिजीत पाटील, मराठा नेते गंगाधर काळकुटे, शिवसेना संपर्कप्रमुख महेश साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष समाधान काळे, अक्कासाहेब मोहिते पाटील, यशराज साळुंखे पाटील, शहाजी साळुंखे, राजाभाऊ माने, शेतकरी नेते समाधान फाटे, नवनाथ माने, संतोष ननवरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
तसेच छावा क्रांतीवीर सेनेचे सर्व विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची उपस्थिती अधिवेशनाला यशस्वी करण्यात महत्त्वपूर्ण ठरली. संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो छावासैनिक उपस्थित राहिले आणि या अधिवेशनात एकमताने निश्चय करण्यात आला की “शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसल्याशिवाय छावा क्रांतिवीर सेना आता शांत बसणार नाही”.
अध्यक्ष करण गायकर यांनी सरकारला थेट इशारा दिला की, “राज्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांची चेष्टा करत आहेत, त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. अशा शेतकरी विरोधी अजित पवारांचा तात्काळ राजीनामा घ्यावा तसेच त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी द्यावी की, शेतकरी बद्दल वादग्रस्त वक्तव्य अजिबात करू नये. अन्यथा छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरेल आणि हे आंदोलन केवळ निदर्शने न राहता राज्यकर्त्यांच्या झोप उडवेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्जमाफी, पिक विमा या विषयांवर सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून शेतकरी बांधवांचे मन दुखवत आहेत आणि स्वतःला राज्याचे मालक समजत आहेत. ही मगरुरी आम्ही खपवून घेणार नाही त्यांनी जर ही भूमिका सुरूच ठेवली तर छावाच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे केले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास असून तो फक्त शब्दांवर नव्हे तर कृतीवर आहे आणि हा विश्वास हे दोघंही नक्कीच पूर्ण करतील.
या अधिवेशनात खालील ११ ठराव एकमताने मंजूर करण्यात आले :- शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व शेतीमालाला हमीभाव, मराठा समाजाला ओबीसीमध्ये ५०% आरक्षण देण्यात यावे, दुधाला ६० रु. दर मिळावा तसेच शासनातर्फे दहा रुपये अनुदान जाहीर करावे, पंढरपूरमध्ये शासनाच्या वतीने मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे, महाराष्ट्रातील वारकऱ्यांना साठ वर्षानंतर शासनातर्फे पेन्शन योजना लागू करावी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन, कामगार कायद्यांची अंमलबजावणी, भूमीहीन लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे, मराठी शाळांचा दर्जा सुधारावा, आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालये सक्षम करावीत, शेतकरी युवक श्रमिकांसाठी स्वावलंबन योजना राबवाव्यात.
हे अधिवेशन यशस्वी करण्यामध्ये प्रदेश कार्यकारणीतील प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे, युवक प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग, केंद्रीय कार्याध्यक्ष विजय वाहूळे, प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, प्रदेश संपर्कप्रमुख नितीन शिंदे, युवक प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष बाबा रोटे, उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉ.किरण डोखे, प्रदेश संघटक दिनकर कोतकर, प्रदेश मुख्य संघटक नितीन सातपुते, प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग मोरे, प्रसिद्धी विभाग संपर्कप्रमुख वैभव दळवी, राज्य कार्यकारिणी सदस्य धनराज लटके, सागर कदम, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मनोरमा पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रगती तिवारी, संगीता सूर्यवंशी, सविता वाघ, अश्विनी नरगुंदे आदी प्रमुख उपस्थितीत होते.
तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संदीप राऊत, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे, उत्तर महाराष्ट्र कामगार आघाडी अध्यक्ष प्रवीण पाटील, उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष दिनेश जाधव, कामगार आघाडी उपाध्यक्ष योगेश पाटील, युवा संघटक महाराष्ट्र राज्य अमोल शिंदे, शेतकरी आघाडी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत तात्या डुबल, पश्चिम महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष प्रफुल श्रीसागर, आयटी प्रदेश कार्याध्यक्ष रवी सातपुते, उमेश डरपे तर प्रमुख जिल्हा प्रमुख सोलापूर दत्तात्रेय जगताप, नाशिक आशिष हिरे, नवनाथ वैराळ, बीड राहुल चाळक, नांदेड बालाजी ढगे, सांगली दीपक मुळे, जालना राम पाटील गाडेकर, धाराशिव श्याम पाटील, जळगाव मनोहर शिंदे, सांस्कृतिक पर्यटन विभाग जिल्हा प्रमुख भारत पिंगळे, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख आबा पाटील, शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख गोरख संत, वारकरी आघाडीचे जिल्हाप्रमुख दत्ता महाराज पवार, अमोल देवरे, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश माने यांनी केले तर आभार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हर्षद भोसले यांनी मानले.
या कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रमुख दत्तात्रय जगताप, निलेश शिंदे, युवक जिल्हाप्रमुख मंगेश श्रीसागर, महेश जाधव, संदीप झांबरे, नितीन थिटे, सागर कुरमुरे, प्रणव शिंदे, विशाल शहा, शुभम खेडकर, संदीप खेडकर, सौदागर कोल्हे, सिताराम पाटील आदींसह सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.