सोलापूर : प्रतिनिधी
जुळे सोलापूर येथील इंडियन मॉडेल स्कुल येथे शिक्षण घेतं असलेल्या नाजिया वसीम आतार असे तिचे नाव आहे. नाजिया हिला ९३ टक्के गुण मिळाल्याने आई – वडिलांकडून पेढे भरवत तिचे अभिनंदन केले. तसेच कुटुंबातील लोकांनी आणि नातेवाईकांसह पत्रकार क्षेत्रातील काम करणाऱ्या मित्र मंडळीने देखील तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
इंडियन मॉडेल स्कूलमधील विद्यार्थिनी राजकुमार आणि पद्मिनी सारोळे यांची कन्या सई सारोळे हिने दहावीच्या परीक्षेत ९६.६० टक्के गुण घेऊन यश संपादन केले.
इंडियन मॉडेल स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात ९० टक्केच्यावर गुण असलेले ८२ विद्यार्थी आहेत तर ९० टक्केच्या आसपास गुण असलेले ८० विद्यार्थी आहेत. हर्षदा कामती हिने ९९:६० टक्के गुण घेवून स्कूलमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. सई सारोळे हिने क्लास न लावता यश संपादन केले आहे. त्याबद्दल तिचे इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव अमोल जोशी, संचालिका सायली जोशी, प्राचार्य सुजाता बुट्टे, वर्गशिक्षक जेऊरे, शीरशीकर यांनी अभिनंदन केले आहे