सोलापूर : प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यात सदाशिवनगर येळीव येथे एमआयडीसी मंजूर होण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा पाठपुरावा शासनाकडे सुरू होता. माळशिरस आणि परिसरातील जनतेला सांगायला निश्चितच आनंद होतो आहे की रणजित दादांच्या पाठपुराव्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येळीव येथे एमआयडीसी मंजूर केली आहे.
आता याचा पुढचा टप्पा म्हणून येळीव येथे होणाऱ्या औद्योगिक वसाहतीत सर्व नवीन उद्योजकांना, प्रॉपरायटर शिप कंपनी, पार्टनरशीप कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांनी औद्योगिक जमिनीसाठी अर्ज करावे अशी अधिसूचना महाराष्ट्र सरकार आणि एमआयडीसी कार्यालय, सोलापूर यांनी काढली आहे. माळशिरस तालुक्यातील आणि परिसरातील उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.
माळशिरस तालुक्यात सदाशिवनगर येळीव येथे एमआयडीसी मंजूर होण्यासाठी आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकत्र प्रयत्न केले. या दोन्ही नेत्यांच्या प्रयत्नामुळे माळशिरस तालुक्यातील युवकांना आणि उद्योजकांना नवीन संधी मिळेल असा विश्वास विजय प्रताप युवा मंच अध्यक्ष राजू सुपाते यांनी व्यक्त केलाय.