सोलापूर : प्रतिनिधी
शेतकऱ्यांचा कांदा घेऊन जाणाऱ्या वाहनांवर आरटीओ कडून ओव्हरलोड च्या संदर्भात कारवाई केली जाते. याबाबत डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये माढा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. त्या प्रश्नाला उचलून धरत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आरटीओ नाहक शेतकरी वाहनांवर कारवाई करत असल्याचे सांगितलं. त्यावर पालकमंत्र्यांनी उपस्थित आरटीओ अधिकाऱ्यांना शेतकरी वाहनांवर कारवाई न करण्याची तंबी दिलीय.
माढा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांनी आरटीओ कार्ड पद्धतीने प्रत्येक वाहनाकडून महिला दीड हजार रुपये अवैध गोळा करत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.मोठ्या ओव्हरलोड वाहनांकडून पैसे घेतले जातात तर शेतकरी माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नाहक कारवाई केली जात असल्याची माहिती दिली. त्यावर बोलताना पालकमंत्री यांनी उपस्थित आरटीओ अधिकाऱ्यांना तंबी दिली.तुमच काय चालतंय माहितीय , आम्हाला काढायला लावू नका. तुमच जर काढायला बसलं तर तुमचा कार्यक्रम होईल.नियमाने तर तुमचा एकही आरटीओ काम करत नाही. त्यामुळे शेतकरी माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करू नका.अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत.