पत्रकार सलाउद्दीन शेख यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश.

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील डॅशिंग व अभ्यासू पत्रकार व ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच एनडीटीव्ही व एनआय चे प्रतिनिधी सलाउद्दीन शेख यांनी उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. या प्रसंगी मुंबईत आयोजित विशेष कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.

 

सलाउद्दीन शेख हे गेल्या 18 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारांचे प्रश्न, अडचणी आणि त्यांच्या हक्कांसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वात पत्रकार संघटनेने लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद, नांदेड, परभणी, पुणे, सातारा, सोलापूर आणि मुंबई अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत.

कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलाउद्दीन शेख यांचे पक्षात स्वागत करताना त्याच्या अनुभवाचे आणि सामाजिक योगदानाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले, “शेखसाहेबांच्या माध्यमातून पक्षाला पत्रकारांच्या आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत नवा दृष्टीकोन मिळेल. त्यांच्या अनुभवाचा उपयोग पक्षबांधणीसाठी आणि जनतेच्या हितासाठी होणार आहे.”

या प्रवेश सोहळ्याला लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, नांदेड, औरंगाबाद, पुणे, सातारा, सोलापूर आणि मुंबई येथून आलेले अनेक कार्यकर्ते, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांनी शिवसेनेमध्ये सामील होत पक्षाच्या धोरणांना पाठिंबा दर्शवला.

शेख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “पत्रकारितेतून मी समाजाच्या प्रत्येक थराशी जोडले गेलो आहे. आता शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीतून समाजासाठी काहीतरी करता येईल, याची मला खात्री आहे. उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्याच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळणे, हे माझ्यासाठी गौरवाचे आहे.” तसेच महाराष्ट्राच्या अल्पसंख्याकांच्या विविध प्रश्नाबाबत योग्य रीतीने त्यावर काम करून अल्पसंख्याकांना जरूर शिवसेनेच्या माध्यमातून न्याय देणार असे ते म्हणाले पुढे ते म्हणाले की आत्तापर्यंत अल्प संख्याकांच्या वापर विविध सत्ता धारकांनी केला असून अल्पसंख्यांकाचा कोणताही विकास झालेला नसून शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम अल्पसंख्याकांना आर्थिक शैक्षणिक व धोरणात्मक निर्णय बाबत उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून अल्पसंख्याकांचा विविध प्रश्न मार्गी लावण्याचा शब्दही यावेळी सलाउद्दीन शेख यांनी दिला.

या कार्यक्रमानंतर, शेख यांना शिवसेनेच्या आगामी संघटनात्मक कामात विशेष जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेमध्ये त्यांचा मजबूत संपर्क असल्यामुळे त्यांचे योगदान पक्षासाठी मोलाचे ठरणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!