मतदारास धमकी दिल्याप्रकरणी माजी महापौर मनोहर सपाटे यांचेसह पाच जणांची निर्दोष मुक्तता

3 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर येथील 1) मनोहर गणपत सपाटे वय-60 वर्षे, धंदा- व्यापार, 2) ज्ञानेश्वर बबन सपाटे वय- 40 वर्षे, धंदा- व्यापार, 3) बालाजी उर्फ बंटी किरण सोनके वय- 32 वर्षे, धंदा- व्यापार, 4) ज्ञानेश्र्वर जगन्नाथ सुरवसे वय-37 वर्षे धंदा- व्यापार, रा सर्व मुरारजी पेठ, सोलापूर 5) प्रवीण ज्ञानेश्र्वर झूंजुरडे वय – 35 धंदा – व्यापार, रा. खमितकर अपार्टमेंट जवळ, सोलापूर यांनी सन 2012 रोजीच्या सोलापूर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान मतदार फिर्यादीस पैशाचे आम्हीच दाखवले, धमकी दिली, साक्षीदारास मारहाण केल्याच्या गुन्ह्याकामी मा. मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी साहेब यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली.

यात हकीकत अशी की, सोलापूर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक 2012 साठी प्रभाग क्रमांक 11ब मधून मनोहर सपाटे यांना राष्ट्रवादी पक्षाकडून तर प्रकरणातील साक्षीदार योगेश पवार यांना मनसे या पक्षाकडून उमेदवारी मिळाली होती, दिनांक 4/02/2012 रोजी मनोहर सपाटे यांनी योगेश पवार यांना नामांकन अर्ज माघार घेण्याकरिता दमदाटी केली, तसेच दिनांक 16/02/2012 रोजी रात्री 12.30 चे सुमारास मनोहर सपाटे यांचे सह वर नमूद चार आरोपी हे फिर्यादीचे घरी जाऊन तिस पैसे घ्या व मत मनोहर सपाटे यांना द्या असे म्हणाले, त्यावर फिर्यादीने नकार दिला, त्यानंतर आरोपींनी फिर्यादीचे घरात घुसून तिस शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, दरम्यान बाळू लोंढे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता मनोहर सपाटे यांनी त्यास चापट मारली तर ज्ञानेश्वर सपाटे यांनी फरशी उचलून फेकून मारली अशा आशयाची फिर्याद राणीबाई येरटे यांनी आरोपींविरुद्ध फौजदार चावडी पोलिसात दिली. सदर खटल्याकामी सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले.

यात आरोपीतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे यांनी आरोपींची बाजू मांडली, साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती व उलट तपासादरम्यान मान्य केलेल्या बाबी, मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या, तसेच आरोपीतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की, “फिर्यादी ही योगेश पवार यांची समर्थक असून केवळ निवडणुकीवेळी आरोपींची प्रतिमा मलीन व्हावी म्हणून व त्याचा फायदा योगेश पवार यांना घेता यावा म्हणून फिर्यादीने आरोपींविरुद्ध खोटी केस केली, तसेच उलट तपासादरम्यान फिर्यादी मान्य करतात की त्या योगेश पवार यांच्या खंद्या समर्थक आहेत” या व इतर मुद्द्यांवर युक्तिवाद केला. अभिलेखावर असलेला एकूण पुरावा, आरोपींतर्फे मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मा. न्यायालयाने आरोपींची सभळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.

यांत आरोपींतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. श्रीपाद देशक, ॲड. सिद्धाराम पाटील तर सरकारतर्फे ॲड. अमर डोके यांनी काम पाहिले. तिस शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, दरम्यान बाळू लोंढे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता मनोहर सपाटे यांनी त्यास चापट मारली तर ज्ञानेश्वर सपाटे यांनी फरशी उचलून फेकून मारली अशा आशयाची फिर्याद राणीबाई येरटे यांनी आरोपींविरुद्ध फौजदार चावडी पोलिसात दिली. सदर खटल्याकामी सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले.

यांत आरोपींतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. श्रीपाद देशक, ॲड. सिद्धाराम पाटील तर सरकारतर्फे ॲड. अमर डोके यांनी काम पाहिले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!