सोलापुरात खळबळ, स्पा सेंटर च्या नावाखाली वेश्या व्यवसाय, माया फॅमिली सेंटर वर धाड

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

माया फॅमिली स्पा सेंटर अत्तार कॉप्लेक्स नोबेल हॉऊस दुसरा मजला, विजापूर रोड सोलापूर या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर पणे वेश्या व्यवसाय चालु असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीवरून २३ मे २०२५ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी व अंमलदार सदर ठिकाणी छापा टाकण्याकरिता गेले असता आरोपीने पोलीस बिल्डींगमध्ये येऊ नये म्हणून लिफ्ट बंद केली होती तसेच जिन्याचे लोखंडी गेट कुलूप लावून बंद केले होते. शेजारी बिल्डींग मध्ये असलेली लोखंडी शिडी पोलीसांनी शिताफिने मिळवून पहिल्या मजल्यावर प्रवेश करून छापा टाकला.

त्या ठिकाणी ०४ पिडीत महिला मिळून आल्या, पिडीतांकडून मसाज करून घेऊन त्यानंतर वेश्या व्यवसाय करून घेण्यात येत होता. सदरचे सेंटर हे आरोपी नाव विशाल चंद्रकांत धोत्रे वय ३२ वर्षे राहणार नुराणी मस्जीद च्या पाठीमागे झोपडपट्टी नंबर १ जुना विजापूर नाका, सोलापूर आणि माया फॅमिली स्पा चा मालक नामे संदेश साळवे राहणार ठाणे म्हणून त्यांच्यावर मपोह/०७ अकिला युसुफ नदाफ यांचे फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाणे येथे गुरंन. २२३/२०२५ येथे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५, ६ सह भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १४३ (२) (३) १४४ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हयाचा तपास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडून करण्यात येत असून आरोपींना मा. न्यायालयाने आरोपीची गुन्हयाचे तपासकामी दिनांक २७ मे २०२५ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे.

याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर वेश्या व्यवसाय चालत असल्यास त्याबाबची माहिती पोलीसांना द्यावी.

ही कामगिरी ही प्रभारी पोलीस आयुक्त अजित बोराडे व पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दिपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरिक्षक महादेव राऊत, स फौ. हेमंत मंठाळकर, पोहेकॉ महादेव चंडगर, मपोहेकों/अकिला नदाफ, मपोडेका सुशिला नागरगोजे, मपोहेकों/नफित्ता मुजावर, नपोका सुजाता जाधव, मपोकों सीमा खोगरे, नपोकों/ उथा मळगे, मपोकॉ/१२२७ चिकमळ पोहे/१४१७ शैलेश बुगड नेमणूक गुन्हे शाखा चालक पोकों/७२४ दादा गोरे यांनी शिताफिने कामगीरी करून सदरचा छापा यशस्वी केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!