सोलापूर : प्रतिनिधी
पुणे येथे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती दिमाखात पार पडला या सोहळ्यात बेवारस मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणारे संभव फाऊंडेशनचे अध्यक्ष आतिश सिरसट यांना आयुष्यमान भारत महाराष्ट्र समिती अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या शुभहस्ते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सोलापूरचे पालकमंत्री ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, मंत्रालय तथा विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, डिजीटल मीडिया संघाचे जेष्ठ पत्रकार राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र महा गौरव पुरस्कार २०२५ ने गौरविण्यात आले.
बेवारस मनोरुग्णांच्या जीवनात परिवर्तन घडवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अविरत कार्य करणारे आतिश सिरसट यांनी तीनशेहून अधिक मनोरुग्णांचे कौटुंबिक पुनर्वसन संभव फाउंडेशनच्या माध्यमातून केले असून संभव फाउंडेशनच्या माध्यमातून संभव शैक्षणिक प्रकल्प, संभव अन्नपूर्णा योजनाच्या माध्यमातून निराधारांना शहरात अन्नदान देणाच कार्य संस्था करते.