पैलवान तोफिक शेख यांचा इशारा, समस्या दूर करा अन्यथा घागर मोर्चा आणणार

1 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

नई जिंदगी प्रभाग 21 परिसरातील सर्व नगरांमध्ये सोलापूर महानगरपालिका मार्फत होणारा पाणीपुरवठा दर आठ दिवसाला एकदा व कमी दाबाने येत आहे. तसेच प्रभाग क्रमांक 21 मध्ये गेल्या दोन महिन्यापासून पिण्याचे पाणी अ वेळी येत असून पाण्याचा दबाव देखील कमी असतो व तसेच अनियमितपणे पाणीपुरवठा होत असून विशेष म्हणजे पाणी हा जिव्हाळ्याचा विषय असताना देखील प्रभागातील नागरिकांना याचे खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.

त्यातच प्रभागातील महिला भगिनींना यांना त्याचे नाहक त्रास सोसावी लागत असून सर्वसामान्य नागरिक हे महापालिकेला नियमित कर आकारणी करत असताना देखील महापालिके मार्फत नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा म्हणजेच नियमित पाणीपुरवठा, प्रभागातील स्वच्छता, रस्त्यावरील पथदिवे, तुंबलेले ड्रेनेज लाईन व गटारी साफ करणे अशी कामे पूर्ण होत नाहीत.

दरम्यान सदरील समस्याचा विचार करून लवकरात लवकर सोडवण्यात यावे अशा आशयाचे निवेदन अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांना देण्यात आले असून लवकरच सदरील समस्या दूर न झाल्यास नई जिंदगी ते सोलापूर महानगरपालिका असे घागर मोर्चा आणणार असा इशारा माजी नगरसेवक तोफिक शेख यांनी दिली. यावेळी प्रभागातील नागरिक व जमातीचे लोकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!