अमर पाटील यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी निवड, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी जबाबदारी

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

हत्तुर जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य अमर रतिकांत पाटील यांची शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी पाटील यांना निवडीचे पत्र मुंबई येथे बाळासाहेबांची शिवसेना भवन येथे पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, संपर्कप्रमुख महेश साठे, माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे उपस्थित होते.

अमर पाटील हे शिवसेनेचे नेते म्हणून ओळखले जातात, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. शिवसेना(उध्दव ठाकरे गट)पक्षातील गटबाजी कंटाळून त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. अमर पाटील यांचे पक्ष संघटनाची शैली, कार्यकर्त्यांची फौज आणि आजतागायत केलेली विकासकामे पाहून त्यांना शिवसेना पक्षाने जिल्हाप्रमुख पदाची संधी दिली आहे. त्यांच्यावर सोलापूर दक्षिण विधानसभा आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

यावेळी मुंबई येथे ‘बाळासाहेब भवन’ येथे अमर पाटील यांना निवडीचे पत्र शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या हस्ते देऊन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अक्कलकोट विधानसभेचे माजी आमदार तथा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, बोरामणी पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आचलारे, सोलापूर शहर प्रमुख सचिन चव्हाण, महिला आघाडीच्या अनिता माळगे, प्रियंका परांडे, संजय कोकाटे आदी उपस्थित होते.

सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यात भगवा फडकाविणार ; अमर पाटील 

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे सचिव संजय मोरे, संपर्कमंत्री प्रताप सरनाईक, संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या सहकार्याने आपली जिल्हा प्रमुखपदी निवड झाली आहे. येणा-या काळात गाव तेथे शाखा, घर तिथे शिवसैनिक हा उपक्रम राबवून तळागाळापर्यंत शिवसेना पक्ष पोहचविण्या साठी प्रयत्न करणार आहोत. आगामी सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आपण प्रयत्न करणार, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ‌ शिंदे यांच्या माध्यमातून सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्याचा विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!