सोलापूर : प्रतिनिधी
कस्तुरबा नगर येथील श्री बसवारूढ महास्वामी मठाचे संस्थापक व प्रमुख आध्यात्मिक मार्गदर्शक श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामी (आप्पाजी) यांचे आज लिंगैक्य झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली असून, भक्तवर्ग, साधूसंत व अध्यात्मिक विश्वामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आप्पाजींचे पार्थिव गुरुवार, दिनांक २९ मे २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून अंत्यदर्शना साठी श्री बसवारूढ मठ, कस्तुरबा नगर (विमानतळाच्या मागे), सोलापूर येथे ठेवण्यात येणार आहे.