सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त पार्क चौकातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पार्क चौकातील फूटपाथवर वजन काटा घेऊन व्यवसाय करणाऱ्या एका गरजवंताला संभाजी ब्रिगेडच्या वतीने पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून रेनकोट व छत्री देऊन मदतीचा हात देण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, जिल्हा संपर्कप्रमुख छत्रगुण माने, शहर उपप्रमुख मनीषा कोळी, जिल्हा सचिव सिद्धाराम सवळे, शहर संघटक शेखर कंटीकर, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र माने, कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर, पूर्व सचिव सतीश वावरे, शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद, सागर शिंदे, आदी उपस्थित होते.