सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार एम. एस. शर्मा, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे सोलापूर तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश, सोलापूर यांच्या मार्गदर्शना खाली ३१ मे २०२५ रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्यात आला.
जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करताना, तंबाखूमुळे होणा-या आरोग्याच्या हानीबाबत जनजागृती करणे हा या दिवस साजरा करण्याचा उददेश आहे. तंबाखू सेवनामुळे हदयाला त्रास होतो, फुफ्फुसे निकामी होतात, पक्षाघात होतो, कर्करोग आणि मधुमेहाचा धोका ही वाढतो. दरवर्षी तंबाखू सेवनामुळे लाखो लोकांचा मत्यू होतो त्यामुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा तर्फे प्रचार व प्रसार करण्यात आले आहे, यावेळी लोकअभिरक्षक कार्यालयाचे प्र.मुख्य लोकअभिरक्षक शिव झुरळे यांचे समवेत अँड सोलनकर, अँड. म्हेत्रे व सर्व विधिज्ञ, कर्मचारी व महाराष्ट्र सुरक्षा बला चे जवान यांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली.
सदर कार्यक्रम यशस्वी करणेकरीता सचिव उमेश देवर्षी यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक एस.ए.जी. नदाफ, तसेच कर्मचारी बाजीराव जाधवर, प्रविण विभुते, प्रसन्न गुळेद, श्रीमती काजल चव्हाण, एल.एच. शेख यांनी प्रयत्न केले.