सोलापूर : प्रतिनिधी
आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून ते पैसे किडनी आजार असलेल्या युवक रुग्णास उपचारासाठी आर्थिक मदत करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. या उपक्रमाद्वारे त्यांनी एक नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.
मिलिंद नगर येथील रहिवासी शशिकांत तळमोहिते यांचा 19 वर्षीय मुलगा प्रशिक तळमोहिते याला किडणीचा आजार आहे. दोन दिवसाआड चार ते पाच हजार रुपये इतका डायलिसिसचा खर्च आहे. त्याच्यावर सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किडनी प्रत्यारोपणची गरज आहे. किडणी प्रत्यरोपणा साठी 18 लाख इतका खर्च सांगण्यात आला आहे. त्यास आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
ही बाब लक्षात घेऊन RPI(A) नेते राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनानुसार कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून ते पैसे प्रशिक तळमोहिते याच्या उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात आली. अनोख्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जोपासत हा वाढदिवस साजरा केला. कामगार नेते सदाफुले यांनी या उपक्रमाद्वारे एक नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.
आज सायंकाळी शशिकांत तळमोहिते यांच्याकडे ही आर्थिक मदत प्रशिक सामाजिक संस्थेचे सुशील सरवदे, कामगार नेते बापूसाहेब सदाफुले, पत्रकार किरण बनसोडे यांच्या हस्ते सोपविण्यात आली. याप्रसंगी शिवम सोनकांबळे, युनियनचे सचिव विठ्ठल सोनकांबळे, कार्याध्यक्ष योहान कानेपागुल, खजिनदार अरुण म्हेत्रे, सह सचिव रामचंद्र चंदनशिवे, वाहनचालक प्रमुख लक्ष्मण मुरटे,नागेश रणखांबे, विजय सोनवणे, अप्पा तळभंडारे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
मी मदत केली, तुम्हीही करा : सदाफुले
किडनी आजाराच्या उपचारासाठी प्रशिक तळमोहिते या 19 वर्षीय युवकास मदतीची गरज आहे. त्यांना मदत करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या खर्च टाळून मी ही मदत केली. सामाजिक बांधिलकी जोपासली. शशिकांत भिमराव तळमोहिते ( मो. नं. 7276104296), बँक ऑफ इंडिया- अकाउंट नंबर – 070018210008014 / IFSC CODE:-BKID0000700, शाखा निला नगर, सोलापूर यावर इतरांनीही त्यांना मदत करावी, असे आवाहन यावेळी कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी केले आहे.