सोलापूर : प्रतिनिधी
धाराशिव येथील न्यू क्लासीक जेन्टस सलून चालक ऋतुराज मोरे यांच्यावर उधार कटींग व दाढी न केल्यामुळे धारदार शत्राने हल्ला करण्यात आला. या हल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्यांना जिल्हा शासकिय रूग्णालयात दखल केल असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
तसेच, दुसरी घटना वेताळवाडी येथील सोमनाथ मारूती राउत याचे बाबतही उदारीचे पैसे मागण्यावरून प्राण धातक हल्ला झाला असून आरोपी सध्या फरार आहे. वरचेवर नाभिक दुकानदावर हल्ले होत आहेत. तरी या विषयामध्ये लक्ष देवून आरोंपीवर कडक कारवाई करण्याचे आदेश द्यावे.
अशी मागणी सकल नाभिक समाज सोलापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन द्वारे केली आहे. वैद्यकिय क्षेत्रात सुरू केलेले कलमा प्रमाणे नाभिक दुकानदाराच्या हल्या बाबत कलम लागु करावे अशी मागणी देखील यावेळी केली.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष मनोज डिगे, महामंडळ जिल्हाध्यक्ष संजयजी चिखले, महामंडळाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत राऊत, संतोष धोत्रे, प्रभाकर भालेकर, पांडुरंग चौधरी, अभय कांती, सिद्ध राऊत, प्रभाकर राऊत, भीमाशंकर कोरे, प्रकाश शिंदे व नाभिक समाज मधील मान्यवर, युवक उपस्थित होते.