सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयात सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.राज ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी सोन्या मारुती गणपती येथे महाआरती करण्यात आली.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला. मनसेच्या या रक्तदान शिबिराची सुरुवात सकाळी नऊ वाजता गणपतीची महाआरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.या रक्तदान शिबिरासाठी शहर जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूर शहरासह अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, उळे येथील मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहात रक्तदान शिबिरात उस्फुर्त सहभाग नोंदवला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहर प्रमुख जैनुद्दीन शेख, राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख अभिषेक रंपुरे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख प्रसाद कुमठेकर, शहर अध्यक्ष जितेंद्र टेंभुर्णीकर, शिक्षक सेना राज्य चिटणीस जयवंत हाक्के, शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोषकुमार घोडके, कामगार सेना शहराध्यक्ष श्रीधर गुडेली आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
राज ठाकरे यांचा आदेश शिरसावंद मानत कोविड काळात देखील सोलापूर मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. आज राज साहेबांचा वाढदिवस आणि जागतिक रक्तदान दिन असल्याने रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आले. भविष्यात देखील असे समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जातील.
विनायक महिंद्रकर : जिल्हाध्यक्ष मनसे
यावेळी मनसेचे सुभाष माने, पवन देसाई, जयश्री हिरेमठ, करुणा यादव, रुपाली माळवदकर, रोहित कलशेट्टी, नागेश पासकंटी, गोविंद बंदपट्टे, संध्या भोसले, गणेश भोसले, अर्चना इंगळे, कल्पना कांबळे, सुनिता जाधव, सागर जिडगी, बापु रेड्डी, प्रकाश कोळी, वीरसंगप्पा भोज, सचिन पाटील, प्रभाकर कारंडे, संतोष बारटक्के, विशाल गुजले, इश्वर अतनुरे, आकाश करजगी, सुमित पवार, राम रेड्डी आदींसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.