सोलापूर : प्रतिनिधी
सोमपा मधील २४९ बदली रोजंदारी कर्मचारी व १५ वाहन चालक यांना सेवेत कायम करण्या संदर्भात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले, यासह कामगारांच्या समस्यांबाबत चर्चा देखील केली.
याचं बरोबर उपमुख्यमंत्री व नगर विकास खाते मंत्री एकनाथ शिंदे कार्यालयाकडील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सुमित वजाळे यांनी दिनांक १६/०६/२०२५ रोजी ठीक ११ वा. नगर विकास खाते कार्यालयाकडे सोमपा मधील २४९ बदली रोजंदारी व १५ वाहन चालक यांना सेवेत कायम संदर्भात बैठक आयोजित केली.
यावेळी दिनांक २८/०४/२०२५ रोजी सोलापूर महानगर पालिका प्रशासनाने२४९ बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा दुरुस्ती प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याने त्या प्रस्तावा मधील मंजूर असलेली विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी व नवीन पदे निर्माण करुन उर्वरित कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्या संदर्भात नगर विकास खात्याने सोमपा प्रशासनास लवकरात लवकर मंजूरी द्यावी व गेली २५ वर्षापासून प्रामाणिकपणे साफसफाई करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी बैठकीत निवेदनाद्वारे केली.
यावेळी नगर विकास खात्याचे सचिव गोविंदराव सर यांनी या संदर्भात सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री व नगर विकास विभाग मंत्री कार्यालय कडील सुमित वजाळे व ट्रेड युनियनचे अध्यक्ष, कामगार नेते बापूसाहेब सदाफुले व पदाधिकाऱ्यांना ठामपणे सांगितले आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री, नगर विकास खाते मंत्री कार्यालय कडे हा प्रस्ताव तातडीने मागवुन घेऊन महानगरपालिका निवडणुका आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर सोमपा मधील २४९ बदली रोजंदारी व १५ वाहन चालक कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून न्याय देणार असल्याचे वजाळे सर यांनी ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांना ठामपणे सांगितले.
यावेळी बैठकीस ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले, खजिनदार अरुण मेत्रे, पिंटू जेटीथोर, लक्ष्मण मुरटे, नरेश कदम, इत्यादी ट्रेड युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.