सोलापूर : प्रतिनिधी
नवी पेठ येथील युवा उद्योगपती, सुपर शूजचे मालक, शिवसंदेश ग्रुपचे माजी अध्यक्ष राहुल गोयल यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ३७ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
नवी पेटीतील व्यापारी चैनसुख गोयल यांचे ते चिरंजीव होत, राहुल गोयल हा मेहनती, सुसंस्कृत व समाजाभिमुख युवक होते. उद्योगविश्वात त्यांनी तरुण वयात मोठे यश संपादन केले होते. त्यांच्या अकाली जाण्याने उद्योग, समाज आणि परिवारासाठी मोठी हानी आहे. त्यांच्या मित्र परिवारातून हळ हळ व्यक्त होत आहे.