सोलापूर : प्रतिनिधी
जय मल्हार चौक, बुधवार पेठ येथे विद्युत तारा लोंबकळत होत्या तसेच सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचे मानाच्या सात नंदी ध्वजाच्या काट्या व लाखो भाविक जय मल्हार चौक मातंग वस्ती इथून सिद्धेश्वर महाराजांची दोन लिंग असल्यामुळे ये जा करतात व या विद्युत वाहिनीच्या तारा लोकांच्या घरावर सुद्धा आहेत.
त्यामुळे सोलापूर शहर उत्तर युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश लोंढे यांनी महावितरणचे शहर कार्यकारी अतिरिक्त अधीक्षक हेमंत तापकिरे यांना निवेदन देऊन घटनास्थळी भेट देण्याची विनंती केली. त्यांचे विनंतीला मान देऊन तापकिरे यांनी जय मल्हार चौक, मातंग वस्ती परिसरात आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांने समवेत पाहणी केली. व तसेच या विद्युत वाहिनीच्या तारा काढून नव्याने केबल वायर टाकण्याचे काम लवकरच हाती घेऊ असे आश्वासन दिले. भेट दिल्यानंतर महावितरणचे अधीक्षक हेमंत तापकिरे यांचा सत्कार भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उत्तरचे युवक कॅांग्रेसचे अध्यक्ष महेश लोंढे, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भैरूआबा लोंढे, सहाय्यक अभियंता सुनिल टेळे, तंत्रज्ञ चिदानंद कलबर्गी, अभिषेक आबुटे, सुरेश लोखंडे, पंकज रणदिवे, गणेश वाघमारे, अभिजीत डोलारे, रोहित रणदिवे, महेश कांबळे, पृथ्वीराज लोंढे, अभिषेक पटोळे आदी उपस्थित होते.