ईच्छा भगवंताची परिवाराचे सामाजिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद : विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र, पिंपरी चिंचवड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार तथा महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा ईच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं शनिवारी जुना एम्प्लॉयमेंट चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी फटाक्यांच्या आतिषबाजी करत जंगी स्वागत केले.

दरम्यान अण्णासाहेब बनसोडे यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, निळी मखमली टोपी, निळी शाल, पुष्पगुच्छ, सोलापूरची प्रसिद्ध चादर, कडक ज्वारीची भाकरी आणि शेंगा चटणी देऊन त्यांचं सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, डि.के.मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे, उमेश जाधव, संतोष ऋतिक गायकवाड, अक्षय जाधव, किरण शिंदे, अमोल जगताप, माऊली जरग, प्रथमेश पवार, सोनू पटेल, रोहन भडांगे, उत्कर्ष गायकवाड,अजिंक्य जाधव, कार्तिक जाधव, अजिंक्य शिंदे, फिरोज पठाण, आनंद गाडेकर,माणिक कांबळे,वसंत कांबळे, महादेव राठोड, दिनेश आवटे, तुषार गायकवाड यांच्यासह ईच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी सदस्य आदींची उपस्थिती होती.

दरम्यान ईच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक लक्ष्मण जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार सामाजिक संस्थेचे कार्य नेहमीच कौतुकास्पद आहे त्यांचे कार्य समाजाला दिशा आणि प्रेरणादायी देणारे आहे. किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांनी राजकीय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक कार्यात देखील त्यांचे कार्य मोलाचे असल्याचे मनोगत यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी व्यक्त केलं.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!