सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका 28 नंबर शाळा येथील मैदान परिसर सुंदरम नगर (स्वामी समर्थ मंदिर) विजापूर रोड सोलापूर येथील शालेय विद्यार्थी व योगमित्र, पर्यावरण मित्र उपस्थितीत योग आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक परमेश्वर सुतार, नारायणकर सर, शिक्षक वर्ग, योगशिक्षक अनिता कोडमुर, महाएनजिओ फेडरेशनचे जिल्हा समन्वयक, पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर, मंडल अध्यक्ष महेश देवकर उपस्थित होते. विद्यार्थी वर्ग, केंद्रप्रमुख परमेश्वर सुतार यांच्या अंतर्गत 45 शाळेमध्ये योगसाधना घेण्यात आले.
यासाठी महा एनजीओ फेडरेशनचे अध्यक्ष, राज्यमंत्री शेखर मुंदडा, संचालक अमोल उंबरजे, संचालक मुकुंद शिंदे, यांचे मार्गदर्शना खाली विविध ठिकाणी योगसाधना घेण्यात आली.