पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये वैद्यकीय क्षेत्रात चांगली कामे होत असून आम्ही भाजप उमेदवार राम सातपुते यांनाचं निवडून आणणार : फार्मा डिस्ट्रिब्युटर

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा निवडणूक प्रचार दौऱ्यात आमदार विजय देशमुख यांच्या नेतृत्वात व सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या उपस्थितीत सोलापूर शहरातील फार्मासुटिकल व्यावसायिकांच्या भेटी घेण्यात आल्या. या निमित्ताने मे. बलदवा इन्टरप्रायजेस, सोलापूर फार्मा हब एल.एल.पी, बाहेती डिस्ट्रिब्युटर, युनायटेड एजन्सी या फार्मा डिस्ट्रिब्युटरला भेट देऊन त्यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहाने स्वागत करत लोकसभा विजयासाठी शुभेच्छांचा वर्षांव करण्यात आला.
पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये वैद्यकीय क्षेत्रात चांगली कामे होत असून यामुळे आमच्या सारख्या फार्मा डिस्ट्रिब्युटरलाही फायदा होत आहे. आज मोदीजींमुळे देश विकासाकडे वाटचाल करत आहे, त्यामुळे यंदाही आम्ही मोदीजींच्या सरकारला निवडून देऊ अशा भावना फार्मा डिस्ट्रिब्युटर यांनी व्यक्त केल्या.
याप्रसंगी भाजपा केमिस्ट असो. पश्चिम महाराष्ट्र संयोजक बसवराज मणुरे, भाजपा केमिस्ट असो. सोलापूर अध्यक्ष सचिन कुलकर्णी, बलदवा एन्टरप्राजेस प्रमुख मनिष बलदवा, सोलापूर LLP प्रमुख सिद्धाराम घाळे, बाहेती डिस्ट्रिबुटर्स प्रमुख शाम बाहेती, युनायटेड एजन्सीचे प्रमुख व्यंकटेश पुजारी तसेच सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.