
सोलापूर : प्रतिनिधी
४२ सोलापुर लोकासभा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचार निमित्त राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर कार्याध्यक्ष नानासाहेब काळे यांच्या मार्गदर्शनांखाली प्रभाग क्रमांक ७ येथे होम टू होम प्रचार करण्यात आला. पत्रा तालीम, सवार गल्ली, माळी गल्ली, शिव मंदिर, काळी मशिद, आदी भागातून प्रचाराची सुरवात करण्यात आली.
तसेच पत्रा तालीम येथे दिनाक १ मे रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता प्रणितीताई शिंदे यांचा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यामधे पत्रा तालीम परिसरातील महिला सुद्धा तयारीला लागल्या आहेत. यावेळी पत्रा तालमीचे जेष्ठ सल्लागार तात्या चव्हान यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पत्रा तालीम परिसर व प्रभाग ७ हा पूर्वी पासून सर्व धर्म समभावाला मानणारा वर्ग आहे मोदी सरकार आल्यापासून महागाई वाढली अहे. त्यामुळे आपण सर्वांनी प्रणिती शिंदे यांना विजय करा असे आवाहन केले.
यावेळी दत्ता बनसोडे, ज्ञानेश्वर बनसोडे, निशांत सावळे, सौरभ कान्हेरे, अनिकेत बनसोडे , किशोर गाडेकर, अवधूत सुरवसे, विनायक भोजरंगे, करण कोळेकर, सार्थक साखरे, अथर्व शिंदे, आकाश धोत्रे, प्रज्वल काळे, वैष्णव फुगारे, शिवम मोरे आदि कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.