सोलापूर : प्रतिनिधी
प्रत्येकाच्या घरी कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या पुरोहित संघाचे पदाधिकारी आणि सदस्य आपापल्या परीने शुभकार्ये करत असतात. शुभकार्याच्या निमित्ताने यजमानांच्या घरी सर्वांसाठी ‘सुरुचि भोजन’ तयार केले जाते. यजमान असलेल्या सदस्यांपैकी कोणीतरी आलेल्या नातेवाईकांना नको म्हटले तरीही, विनाकारण ‘अन्न’ वाढतात. अगोदरच भरपेट ‘अन्न’ खाल्याने पुन्हा खाऊ शकत नसल्याने नाईलाजाने ताटातील ‘अन्न’ कचरापेटीत टाकले जातात. यामुळे ‘अन्न’ वाया जातोच, शेतकरी बांधवाने ‘अन्न’ तयार करण्यासाठी घेतलेला श्रम, कष्ट वाया जाते, यजमानांनी अन्नासाठी केलेला खर्च व्यर्थ होतो आणि आचारी सुध्दा ‘अन्न’ चविष्ट व रुचकर बनवण्यासाठी घेतलेला मेहनतही फुकट जातो. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत आवश्यकता असून, फक्त मानवाच्या जगण्याचा विचार केला, तर यातील ‘अन्न’ ही सर्वात मुख्य आणि अत्यंत गरजेचे आहे.
निवेदनाद्वारे आग्रहाची विनंती केली की, कधीही – कुठेही शुभकार्यासाठी जात असाल तेव्हा, शुभकार्य झाल्या – झाल्या (जेवणाचे पंगत सुरु होण्यापूर्वी) आलेल्या पाहुण्यांना माईकद्वारे विनंती करुन, ‘अन्ना’संदर्भात जनजागृतीही करुन, माहिती सांगावेत. पोटभर खा.. तृप्त व्हा. पण, ‘अन्न’ कचरापेटीत टाकू नका आणि यजमानांनी शेवटी उरलेले (शिल्लक) ‘अन्न’ गरजूंना किंवा सामाजिक संस्थाशी संपर्क साधून त्यांना द्यावे, जेणेकरुन ते अन्न गरजूंना देउन मदत करतात.
यावेळी अध्यक्षा सौ. ममता मुदगुंडी, सहसचिवा सौ. ममता तलकोकूल व सदस्या सौ. संगीता रॅकम. निवेदन स्वीकारताना पद्मशाली पुरोहित संघम वेदपाठ शाळेचे अध्यक्ष देविदास अन्नलदास, अरविंद जिल्ला, हरिकृष्णा नल्ला, पांडुरंग सामल, श्रीनिवास गाजूल, श्रीनिवास म्याडम, बृहस्पती स्वर्गम, शिवानंद गोली, श्रीनिवास रापोल आदी उपस्थित होते.