रुपेशकुमार भोसले यांनी घेतलेल्या महाआरोग्य शिबिरात 167 गरजूंनी घेतला लाभ, राष्ट्रवादी काॅग्रेस वर्धापन दिना निमित्त उपक्रम

सोलापूर : प्रतिनिधी
जुनाविडी घरकुल येथे राष्ट्रवादी VJNT सेल शहर अध्यक्ष रुपेशकुमार भोसले यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या राष्ट्रिय अध्यक्ष, उपमुख्यमंञी अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या आदेशाने विविध सामाजउपयोगी कार्यक्रम घेतले.
जुना विडीघरकुल येथे पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमीत्त आरोग्य शिबीर, तीन महिणे घरोघरी जाऊन बि पी, शुगर तपासणी व तसेच घरकुल मधील जेष्ठ नागरीकांच्या दिर्घआयुषासाठी त्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी त्यांचा शुभेच्छा देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी शहर अध्यक्ष संतोष पवार यांनी या कार्यक्रमाचे व रुपेशकुमार भोसले यांच्या कार्याचे कौतुक केले. डाॅ श्रीनिवास पिंडीपोल यांनी माझ्या कडे आलेले गरीब रुग्ण मि रुपेशकुमार भोसले यांच्या कडे पाठवून सिव्हिल ला योग्य उपचार मिळून देण्यासाठी त्यांना सांगतो अश्या शब्दात कौतुक केले.
या वेळी या कार्यक्रमाला डाॅ जेजुरे, दत्त बडगंची, किरण माशाळकर, प्रकाश जाधव, सोमनाथ शिंदे, शरुगन माने, प्रकाश मोटे, दिलीप शिंदे, दया पाचंगे, कृष्णाहरी सामल, अंबादास भोसले, घरकुल परिसरातील नागरीक व माता भगिणी यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती, या शिबीराचा लाभ 167 गरजूनी घेतला.