सोलापूर : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने महाराष्ट्रासह कर्नाटकातील स्वामी भक्तांना स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेता यावे यासाठी सहा महिन्याची पालखी परिक्रमा काढण्यात येते.
हि स्वामींच्या पादुकाची पालखी अक्कलकोट येथून सुरुवात होऊन सोलापूर, पुणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, परभणी, नांदेड यासह कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा आधीसह सोलापूर मार्गे पुनश्च अक्कलकोटला रवाना होते. अक्कलकोट ला जाते वेळी सोलापूर मार्गे जाताना परंपरेप्रमाणे मागील 14 वर्षापासून काँग्रेसचे ज्येष्ठ कार्याध्यक्ष सुनील रसाळे यांच्या घरी स्वामीं पालखी येते. यावेळी परीसरातील स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी स्वामी भक्तांची मोठी गर्दी झाली होती.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्याध्यक्ष सुनील रसाळे, प्रशासकिय अधिकारी धैर्यशील जाधव, युवा उद्योजक यशवंत रसाळे, युवराज रसाळे यांच्या समवेत कुटुंबीयांनी एकत्र स्वामींच्या पादुकाचे विधिवत धार्मिक पद्धतीने पूजन करून महा आरती केली या नंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
अवंती नगर विठ्ठल रुक्मिणी मंदिर महिला भजनी मंडळाच्या वतीने स्वामींच्या भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी स्वामींच्या जयघोषाने संपूर्ण परिसर स्वामीमय झाला होता.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले, संजय शिंदे, चक्रपाणी गज्जम, विनोद क्षीरसागर, चेतमल गोयल, नंदू चव्हाण, भाऊ धोत्रे, राजू जवंजाळ, आदींसह शेकडोंनी स्वामींचे दर्शन घेतले.