
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरांमध्ये गेल्या वर्षभरापासून एडवेंचर पार्क बंद अवस्थेत असून त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे त्यामुळे महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेड च्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली “दार उघड बया दार उघड” हे आंदोलन एडवेंचर पार्कच्या समोरील बंद गेटला हार घालून करण्यात आले.
महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सोलापूर शहरातील सर्वच प्रेक्षणीय उद्याने प्राणी संग्रहालय बंद अवस्थेत आहेत महानगरपालिका अधिकाऱ्याचे या प्रश्नाबाबत लक्ष नाही त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
सोलापूर शहरातील नागरिकांना परिवारासह फिरण्यास योग्य अशी कोणती जागा उरलेली नाही परिवारासह एकत्रित बसून फिरण्याचा आनंद घेता येत नाही कारण सोलापुरातील सर्व उद्याने यांची दुरावस्था झालेली आहे. सोलापूर शहरांमध्ये अतिक्रमण सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे याला जबाबदार महानगरपालिका अतिक्रमण विभाग आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडचे वतीने करण्यात आलेला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र राज्य शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष शेखर चौगुले, सुशांत पवार, आर्यन कदम, ओंकार कदम, सुरेश पाटील, दीपक जाधव, कलीम काझी, महेश भंडारे, रमेश चव्हाण, हनुमंत शरणार्थी, सोन्या गवळी, तेजस शेळके, रुपेश कुमार किरसावळगी, शेखर चौगुले, सिताराम बाबर, रमेश चव्हाण, लखन गायकवाड आधी उपस्थित होते.