
सोलापूर : प्रतिनिधी
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सोनाई फाउंडेशन व स्वयं शिक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा उत्सव म्हणून दहीहंडी उत्सव 2024 आयोजन जुळे सोलापुरात करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर माळशिरसचे आमदार राम सातपुते, श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मंजय महाराज भोसले,
राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष किसन जाधव, माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अपंना सतुबर यांच्यासह आयोजक युवराज राठोड, सोमेश वैद्य आदी सह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक सोमेश वैद यांनी करत कार्यक्रमा मागील रूपरेषा विषद केली. सोनाई फाउंडेशन आणि स्वयंम् शिक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून मागील वर्षभरात करण्यात आलेल्या सामाजिक कार्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
अध्यक्ष भाषणावेळी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी सोनाई फाउंडेशनचे प्रमुख युवराज राठोड आणि स्वयंम् शिक्षा फाउंडेशनचे प्रमुख सोमेश वैद्य यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. हिंदूंचे पारंपारिक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे व्हावेत हिंदू संस्कृती सर्वांना समजणे गरजेचे आहे. राठोड आणि वैद्य यांच्या हातून देव देश आणि धर्मासाठी करावे घडो असे म्हणत आमदार राम सातपुते यांनी त्यांच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या.
यानंतर पुणे, मुंबई, बारामती यासह विविध जिल्ह्यातून आलेल्या गोविंदा पथकाने आपले सादरीकरण केले.