शोएब महागामी यांचा सामाजिक उपक्रम, दोन लाख स्मार्ट मतदान कार्ड वाटप करणार

सोलापूर : प्रतिनिधी
मतदान स्मार्ट कार्ड तयार करून घेत असताना ई महा सेवा केंद्र असो किंवा काही खाजगी कार्यालय असो फार पैसे खर्च होतात. तसेच रांगेत उभे राहून बराच वेळ जातो. अशा मध्ये सर्वसामान्य नागरिक असो किंवा कामगार वर्ग असून त्यांच्या कामावर सुट्टी करून त्यांना मतदान कार्ड ची कामे करावी लागतात, त्यासाठी या सर्वांचा विचार करून त्यांच्या पैशाची आणि वेळेची बचत व्हावी, तसेच मोफत कार्ड उपलब्ध व्हावे साठी शहर मध्य विधानसभा मतदार संघातील गरजू लोकांना मोफत मतदान स्मार्ट कार्ड तयार करून दिले जात आहे.
हा स्तुत्य उपक्रम शोएब महागामी सामाजिक संस्थेच्या वतीने केला जात आहे. या संस्थेच्या माध्यमातून सध्या साडे बत्तीस हजार कार्ड करून देण्यात आले आहेत. दोन लाख मतदार तयार करून देण्याचे उद्दिष्ट या संस्थेने केले आहे. त्या नुसार त्यांचे प्रयत्न सुरू आहे. म्हणून सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून शहर मध्ये विधानसभा मतदारसंघांमध्ये वेग वेगळ्या ठिकाणी डिजिटल फलक लावून माहिती देण्यात येत आहे.
मतदान स्मार्ट कार्ड तयार करून देण्याचे ठिकाण सोशल हायस्कूल च्या बाजूला संस्थेचे संपर्क कार्यालय आहे. 29 सप्टेंबर पासून हा उपक्रम सुरू केला जात आहे. यावेळी शोएब महागामी, अजहर हरकारे, मोहसीन शेख आधी उपस्थित
होते.