खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा, शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय द्या अन्यथा..

सोलापूर : प्रतिनिधी
सर्व पिकांचा समावेश पिक विमा योजनेत करण्यात यावा, शेतीसाठी 24 तास वीजपुरवठा द्यावा, गावाला शेतकऱ्याला मागणीनुसार एमएसईबी डीपी देण्यात यावा, दुधाला चाळीस रुपये दर मिळावा, जनजीवन योजनेचा अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावेत, डीसीसी बँकेने शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्ज पुरवठा करावा, मराठा धनगर मुस्लिम कोळी समाजास आरक्षण देण्यात यावे, या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने चार हुतात्मा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत भव्य मोर्चा काढला या मोर्चा त शेकडो शेतकरी बांधव सहभागी झाले होते.
या मोर्चात बैलगाड्यांसह खासदार प्रणिती शिंदे यांनी स्वतः नांगर घेऊन या मोर्चाचे नेतृत्व केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले, यावेळी माजी आमदार दिलीप माने, सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भाजप आणि महायुतीवर सडकून टीका केली.
सोयाबीन तूर कांदा उडीद व फळबाग पिकांना विमा मिळावा, शेतकऱ्यांना अवजारे खत औषधानकरिता जीएसटी रद्द करावे, शेतीसाठी 24 तास वीज पुरवठा द्यावा, मराठा धनगर मुस्लिम कोळी समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी शेतकऱ्यांनी, सर्वसामान्य नागरिकांनी या भाजप आणि महायुती सरकारला घरी बसून काँग्रेस, महाविकासाकडे सत्ता द्यावी असे आव्हान शेतकरी मोर्चा च्या माध्यमातून खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.
यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सोलापूर शहर जिल्ह्यातील काँग्रेस, शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.