सोलापूर : प्रतिनिधी
एकीकडे खासदार प्रणिती शिंदे यांचे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत भव्य मोर्चा काढला तर सोलापुरातील काँग्रेस भवन येथे थकीत उस बिलासाठी शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन सुरु होते. अक्कलकोट तालुक्यातील माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मातोश्री शुगर ने शेतकऱ्यांचे उस बिल थकवाल्याने शेतकऱ्यांनी चक्क सोलापूर येथील काँग्रेस भवन कार्यालय येथे अर्धनग्न आंदोलन केले.
जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर महाविकास आघाडीने काढलेल्या मोर्चात माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे सहभागी झाले होते मात्र हाकेच्या अंतरावर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळी त्यांनी किंवा खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट दिली नाही.
अर्ध लग्न आंदोलन करणारे शेतकरी म्हणाले, आम्हीही शेतकरी आहोत ज्या काँग्रेसने महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मोर्चा काढला त्यांनी आमच्या मागण्याकडे ही लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा.