
सोलापूर : प्रतिनिधी
आमदार बबनराव शिंदे यांच्या प्रयत्नातून माढा नगरपंचायतीसाठी वार्षिक जिल्हा योजनेतून सन २०२४-२५ वर्षासाठी नगरोत्थान व दलितेत्तर योजनेमधून ३.२२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माढा शहरात चिंचोली रोड ते गोटे वस्ती रस्ता, नांदकनाथ परिसरात सभामंडप बांधणे, माढा सोलापूर शिव रस्ता ते माढा शेटफळ शिवरस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, कांतीलाल पाटील घर ते मंडई चौक पर्यंत इनलाईन व काँक्रीट रस्ता, लिंगायत स्मशानभूमीतील अंतर्गत रस्ता, कुर्डूवाडी रस्ता ते रणदिवेवाडी शिव पर्यंत डांबरी रस्ता करणे, वार्ड क्रमांक नऊ मध्ये काँक्रीट गटार करणे, धर्मशाळेसमोर सभा मंडप बांधणे, मारकड वाडा कसबा पेठ येथे सभा मंडप बांधणे इत्यादी कामांना प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. तसेच नगरसेवक चंद्रशेखर गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त माढा शहर राष्ट्रवादी काँग्रेस कडून वार्ड क्रमांक ०९ मधील नागरिकांना पाण्याचे जारचे मोफत वाटप करण्यात आले.
सदर पत्रकार परिषदेस माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार नाना भांगे, गटनेत्या सौ. संजीवनीताई भांगे, नगरसेवक राजू उर्फ चंद्रशेखर गोटे, राष्ट्रवादीचे नेते सुभाष जाधव, रा.कॉ.पा.चे तालुका उपाध्यक्ष शहाजी चवरे, माढा शहराध्यक्ष दत्ता अंबुरे, युवक शहराध्यक्ष अनिकेत चवरे, अशोक चव्हाण, सचिन चवरे, औदुंबर चवरे, दर्शन कदम, विकास पवार, रणजीत देवकुळे, अजय नाईकवाडे, शिवरंग गोटे हे उपस्थित होते.
माढा शहराच्या विकासासाठी आमदार बबनराव शिंदे हे सातत्याने पाठपुरावा करून निधी आणत आहेत. माढयातील तहसिल कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीसाठी तेरा कोटी रुपये, श्नी माढेश्वरीदेवी मंदिरासाठी साडेतीन कोटी रुपये, माढयातील किल्ल्याच्या विकासासाठी अडीच कोटी रुपये असा एकोणीस कोटींचा निधी या अगोदर दिला असून ही सर्व कामे प्रगतीपथावर आहेत.