सोलापूर : प्रतिनिधी
महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम असल्याने होम मैदान या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे मंगळवारी रोजी सकाळी उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या वाहतूक मार्गात पोलीस आयुक्तालय कडून बदल करण्यात आला आहे..
बंद करण्यात आले मार्ग..
व्हीआयपी रोड कडे जाण्याचा मार्ग:
विमानतळ, महिला हॉस्पिटल, महावीर चौक, आरडीसी कॉर्नर, सात रस्ता, वोडाफोन गॅलरी, रंगभवन ते होम मैदान
कार्यक्रमाचे ठिकाण मार्ग
१) रंगभवन ते डफरीन चौक
२) पार्क चौक ते मार्केट पोलीस चौकी
३) चार पुतळा ते डफरीन चौक
मंगळवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत हे मार्ग वाहतुकीस बंद राहणार आहेत..
अत्यावश्यकतील वाहने सोडून
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग..
१) स्टॅन्ड कडून विजापूर रोड कडे जाणारी वाहने:
छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवी वेस पोलीस चौकी, भैय्या चौक, रेल्वे स्टेशन, मोदी पोलीस चौकी, पत्रकार भवन मार्गे..
२) पुणे रोड कडून विजापूर रोड कडे जाणारी वाहने:
नवीन बायपास चा वापर करतील..
३) अक्कलकोट रोड , हैदराबाद रोड, तुळजापूर रोड , कडून विजापूर रोड कडे जाणारी वाहने नवीन शेगाव बायपास रोड चा वापर करतील.