शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे कॉलेज कक्ष जिल्हा प्रमुख पदी अनिरुद्ध दहिवडे यांची निवड

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर युवासेना जिल्हा आढावा बैठकीत माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवासेना सचिव कॉलेज कक्ष प्रमुख वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा समन्वयक कॉलेज कक्ष पदी दक्षिण सोलापूर व अक्कलकोट विधानसभा अनिरुद्ध बसवंत दहिवडे यांची निवड विभागीय सचिव अक्षय ढोबळे, युवासेना सोलापूर लोकसभा विस्तारक सिध्दाराम शिलवंत, युवासेना सोलापूर जिल्हा विस्तारक उत्तम आयवळे, युवासेना जिल्हा प्रमुख सोलापूर बालाजी चौगुले, युवासेना शहर प्रमुख विठ्ठल वानकर, विद्यापीठ कक्ष अध्यक्ष लहु गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली.
अनिरुद्ध दहिवडे हे आधी युवासेना कॉलेज कक्ष उपजिल्हाप्रमुख म्हणुन अनेक सामाजिक उपक्रम व अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. याची दखल घेऊन वरिष्ठांकडून या पदाची नियुक्ती करण्यात आली.