शेतकरी सदाशिव चव्हाण आक्रमक, शेतजमिनीचा त्वरित पंचनामा करुन नुकसान भरपाई द्या..अन्यथा..

1 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

शेतकरी सदाशिव रामचंद्र चव्हाण यांची शेती उत्तर सोलापूर तालुक्यातील हागलुर येथे असून शेतजमीन हगलूर गट नं. ११५/१ व ११३ प्रमाणे आहे. तेथे एकरुख उपसा सिंचनद्वारे पाणी कुरनूर धरणाला चालू आहे.

सदाशिव रामचंद्र चव्हाण यांच्या शेतजमिनीतून कॅनल गेला आहे व कॅनल भराव टाकून गेला आहे. आजूबाजूला शेत जमीन असून सदरील पाणी पाझरुन चव्हाण यांच्या शेतात आले आहे.

सध्या जमीन पडीक पडलेली आहे. सदरील कॅनल संबंधित अधिकारी हे कोणतीही दखल घेत नाहीत. शेतजमिनीचा पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळावी माझी अधिकाऱ्यांना सांगण्याची आणि बोलण्याची मर्यादा संपली आहे.

येणाऱ्या काळात मी काय करेल मलाच माहीत नाही असा इशारा संतप्त हताश शेतकरी सदाशिव चव्हाण यांनी बोलताना दिला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!