प्रहारचे जमीर शेख यांनी घेतली मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल यांची भेट

सोलापूर : प्रतिनिधी
मराठा समाज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटिल यांची अंतरवली सराटी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जमीर शेख यांनी आपल्या समर्थकांसह मराठा योद्धा मनोज जरांगे यांची भेट घेऊन अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर मतदार संघातील परिस्थितीवर चर्चा केली.
प्रहार कडून दक्षिण सोलापूर मतदार संघात रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांना उमेदवारी देऊन प्रहार ने अनेकांना झटका दिला आहे. सदर दोन्ही मतदारसंघातील जातनिहाय परिस्थितीचा लेखाजोखा जमीर शेख यांनी मनोज दादा जरांगे यांच्यासमोर मांडला.
सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे, मुस्लिम समाजाचे धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी, तसेच मागासवर्गीय समाजाकडून ॲड राजरत्न आंबेडकर हे तिघे मिळून राज्यात मराठा मुस्लिम आणि मागासवर्गीय या पद्धतीने राज्यातील 288 उमेदवारांना सक्षम करून प्रतिनिधित्व करण्यासाठी तसेच त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
त्याच अनुषंगाने राज्यातील अनेक मातब्बर उमेदवार हे मनोज दादा जरांगे यांची भेट देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे येत असल्याने त्याच अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा अक्कलकोटचे उमेदवार जमीर शेख यांनी अक्कलकोट आणि दक्षिण मतदार संघात संदर्भात मनोज दादा जरांगे यांच्यासोबत चर्चा करून मतदार संघाची परिस्थिती मांडली.