सोलापूर : प्रतिनिधी
Video Player
00:00
00:00
परभणी येथील संविधान विटंबना घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शन करत निषेध नोंदवला. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
Video Player
00:00
00:00
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान संपूर्ण देशाचे असताना त्या संविधानाच्या रक्षणासाठी केवळ आंबेडकरी समाजात रस्त्यावर उतरतो हे दुर्दैव आहे असे सांगतानाच घटनेची तात्काळ चौकशी करून संबंधित आरोपींना शिक्षा व्हावी अन्यथा रिपाइ यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला.
Video Player
00:00
00:00
राजाभाऊ सरवदे (प्रदेशाध्यक्ष, RPI आठवले गट)